तुम्ही कधी तुमच्या स्वप्नांचा उद्दीष्टांचा विचार केला आहे का? आपल्या आयुष्यात आपली अशी अनेक अपुर्ण स्वप्न असतात जी पुर्ण करायची राहुन गेलेली असतात आणि आपल्याला हेच समजत नाही नेमक आपण आपल्या अपुर्ण राहिलेल्या स्वप्नांना कस पुर्ण करायच. आपल्याला आपली स्वप्न आपली ध्येय गाठायची तर असतात पण योग्य मार्ग दिसत नाहित आणि याच विचारात आपण आपल्याच ध्येया पासुन आपल्या स्वप्नां पासुन भरकत जातो लोक जे सांगतील ते ऐकत राहातो मन मारत जगत राहातो नुसता विचार करत बस आता हेच आपल आयुष्य आहे आणि आता हे असच आपल्याला जगायच आहे ध्येयहीन.
पण आता बस आता वेळ आली आहे काही तरी करुन दाखवायची आपली
स्वप्न आपली ध्येये पुर्ण करण्याची आणि स्वाभिमानाने आपल आयुष्य जगण्याची. चला तर
मग आज आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करुत. आणि त्याच साठी या आहेत काही खास
टिप्स :
ध्येय निश्चीती (गोल सेटींग) :
ध्येय निश्चीती म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय साध्य
करायच आहे याचे स्पष्टपणे वर्णन (परिभाषीत) करणे होय. हे एक टुल आहे जे तुम्हाला
तुमच्या ध्येयांकडे लक्ष केंद्रित करण्यात तसेच ते साध्य करण्यात मदत करते.
SMART ध्येये कशी सेट करावी :
विशिष्ट (Specific) : तुमचे
ध्येय नेहमी स्पष्ट आणि स्पेसिफीक ठेवा. जेणेकरुन तुम्हाला आपल्या ध्येयाची
स्पष्टता येईल
मोजता येण्याजोगे (Measurable) :
ध्येये नेहमी मोजता येण्याजोगे असावीत.
साध्य करण्यायोग्य (Achievable)
: ध्येय ही नेहमी साध्य करण्यायोग्य असावीत. ध्येय ठरवताना हे
ध्येय साध्य होईल का हा विचार जरुर करा नंतरच आपल ध्येय ठरवा.
प्रासंगीक (Relevant) : तुमची
उद्दीष्टे ही तुमच्या जीवनातील ध्येयांशी सुसंगत असावीत.
कालबद्ध (Time Bound) : तुमच्या
ध्येयांना कालमर्यादा घाला उ. २१ दिवसात एका पुस्तकाची ४० पाने वाचुन काढणे.
ध्येय निश्चीत करण्यासाठी काही टिपा :
· लहान
ध्येये बनवा : मोठ्या ध्येयांचे लहान ध्येयांमध्ये विभाजन करा.
· नियमीत
पुनरावलोकन करा : आपण आपल्या ध्येया पर्यंत किती पोहोचलो आहोत याचे नियमीत
पुनरावलोकन करा. आणि जीथे शक्य असेल तीथे बदल करत रहा तसेच त्याची उजळणी करत रहा.
· सकारात्मक
रहा : सकारात्मक रहा तसेच स्वथावर विश्वास ठेवा.
· डायरी
मेंटेन करत रहा : डायरी लिहायची सवय लावा तुमच्या डायरीत तुम्ही
तुमच्या ध्येयाचा लेखाजोखा लिहुन ठेउ शकता त्यामुळे तुम्हाला कळेल तुम्ही तुमच्या
यशाच्या शिखरा पासुन किती दुर आहात.
· नेहमी
आनंदी रहा : तुम्ही जेव्हा विचार करता आयुष्यात काहीतरी करुन दाखवायच
आहे. तेव्हा तो तुमचा स्वथाचा तुमच्या प्रगतीसाठी केलेला विचार असतो. म्हणून नेहमी
आनंदी राहुन उत्साहाने कार्य करा आणि कायम मेहनतीने आपली वाटचाल करत रहा.
निष्कर्श...
आयुष्यात प्रगती करण आपली स्वप्न आपली ध्येये गाठण अवघड नसत गरज असते ती फक्त योग्य मार्गदर्शनाची आणि प्लॅनिंगची आज आपण या लेखात हेच पाहिल की, ध्येय निश्चीती कशी करतात स्मार्ट गोल्स कसे सेट करायचे आणि आनंदी राहुन आपल यश कस मिळवायच.

