३ ऑक्टोबर २०२४. ला नवरात्रीचा सण सुरु झाला. हा सण
प्रत्येकजण अगदी उत्साहात साजरा करत असतो. नविन कपडे परिधान करुन गरबा खेळणे नऊ
दिवसांचे नऊ उपास करणे इतकच काय तर सणात वेगवगळ्या वेबसाइट्स देखील आपल्याला
वेगवेगळ्या ऑफर्स देत असतात.
पण तुम्हाला हे माहीत आहे का? नवरात्रीत नवरंगाचे
ही एक महत्व आहे. काय आहे नवरात्रीत नवरंगाचे महत्व. चला तर मग आज आपण जाणुन घेउत
काय आहे नवरात्रीत नवरंगाचे महत्व. नवरात्रीला शारदीय नवरात्री देखील म्हणतात आणि
याच नवरात्रीत नवरंगाचे एक महत्व आहे. नऊ रंग म्हणजे नऊ देवींचे प्रतीक आहे .
कोणत्या आहेत त्या देवी आणि कुठले आहेत ते रंग बघुत या भागात :
शैलपुत्री देवी : पृथ्वी तत्वाचे प्रतीक असलेला पिवळा रंग स्थिरता, ज्ञान आणि बुध्दिमत्ता
दर्शवतो. या रंगाचे प्रतीक माता शैलपुत्री देवी आहे.
ब्रम्हचारिणी देवी : हिरवा
रंग हा शक्ती, उत्साह आणि साहसाचे प्रतीक आहे तसेच हा रंग देवी ब्रम्हचारिणी साठी
ओळखला जातो.
चंद्रघंटा देवी : चंद्रघंटा
देवीचा रंग राखाडी असून हा रंग शांती, प्रेम, आणि करुणा दर्शवतो.
कुष्मांडा देवी : देवी कुष्मांडा
देवी केशरी रंगाचे प्रतिक असुन, हा रंग सृजनशिलता, उर्जा, आणि आत्मविश्वास
दर्शवतो.
देवी स्कंद माता : या
देवीचा रंग पांढरा असुन पाढंरा रंग शांतता तसेच सत्यतेसाठी ओळखला जातो.
कात्यायनी माता : कात्यायनी
मातेचा रंग लाल असून हा रंग उत्साह आणि प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो.
देवी कालरात्री माता : या
देवीचा रंग गडद नीळा असुन नीळा रंग सुख, समृध्दी, शक्ती, रहस्यासाठी ओळखला जातो.
देवी महागौरी : या देवीचा रंग गुलाबी आहे, आणि हा रंग प्रेमाची भावना तसेच
नम्रपणा दर्शवतो.
देवी सिद्धीदात्री : जांभळा रंग.
देवी सिद्धीदात्रीचा रंग जांभळा असुन हा रंग आध्यात्मिक, ज्ञान, बुध्दीचे प्रतीक
आहे.
निष्कर्श :
सर्व मंगल मागंल्ये शिवे सर्वाध साधके शरण्ये त्र्यंबके
गौरि नारायणी नमो स्तुते :
नवरात्रीत नव रंगाचे खुप महत्व असते. म्हणूनच आपण प्रत्येक
दिवशी त्या दिवसा साठी त्या रंगाचे कपडे परिधान करुन सण साजरा करतो आणि हेच आपण या
लेखात पाहिले.

No comments:
Post a Comment